जालना आरोग्य सेवा भरती
Jalna Healthcare recruitment
जिल्हा कारागृह जालना येथील कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी (MBBS) गट-अ व वैद्यकीय अधिकारी (BAMS) गट-ब पदभरती
अधिक्षक, जिल्हा कारागृह जालना यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (MBBS) गट-अ व वैद्यकीय अधिकारी (BAMS) गट-ब यांची दोन रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर ११ महिने करीता भरणे करीता जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. जाहिरातीचा संक्षिप्त नमुना खालील प्रमाणे प्रकाशित करण्यात येत आहे. सविस्तर जाहिरात, अर्जाचा नमुना, त्या अनुषंगाने पदभरतीच्या अटी व शर्ती जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कार्यालय येथे नोटीस बोर्डावर, तसेच https://jalna.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
वरील कंत्राटी तत्वावरील पदांसाठी शैक्षणिक अर्हताधारक इच्छुक उमेदवारांनी जाहिरात परिपुर्ण वाचुन घेऊन तसेच जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात परिपूर्ण भरलले अर्ज जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय जालना येथे सादर करावेत. पात्र उमेदवारांच्या मुलाखतीची तारीख तसेच सदर पदभरतीची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयातील नोटीस बोर्डावर तसेच संकेत स्थळावर पहावेत.
अर्जाचा नमुना व तपशील

0 Comments